राजकीय

"अजित दादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत, राष्ट्रवादी काँग्रेस आमचाच पक्ष" छगन भुजबळांचा शरद पवार गटावर निशाणा

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. शिबीरात अजित पवार गटाचे सर्व नेते, कार्यकर्त्ये, खासदार, आमदार सहभागी झाले आहेत. यावेळी अनेक नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावेळी मोठं वक्तव्य केलं आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण करा. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करु नका. प्रफुल्ल पटेल यांनी काल अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. एकदा नाही, अनेकदा युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न झाला. अजित दादा हे स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १९९९ चाच आहे. आम्ही भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा सोडलेली नाही. तुम्ही चार-चार वेळी बोलणी केली. आघाडी करण्याचा शब्द दिला आणि ऐनवेळी माघारी फिरले. ते चालते आम्ही भाजपसोबत गेलो ते चालत नाही? आम्ही पक्ष सोडला नाही. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्याच विचारानेच जाणार आहोत. नितिश कुमार, जयललिता, मेहबुबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडिच वर्षे शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार गट नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष म्हणून राहिला आहे. यावरुन महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत असून त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तबल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच पक्षाचे नाव आहे. त्यामुळे गावपातळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. आलल्याला जास्तीत जास्त आमदार खासदार निवडूण आणावे लागतील. अडचणीतील लोकांना मदत केली पाहिजे. अजित दादा हे स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले. दादांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस