राजकीय

"गोपीचंद पडळकरांना दिसतील तिथे चोप देणार", अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा

गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत

नवशक्ती Web Desk

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख 'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू' असा केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. यावर पत्रकारांनी त्यांना तुम्ही अजित पवार यांना पत्र का पाठवलं नाही? असा प्रश्न विचारला असता पडळकर यांनी अजित पवारांना 'लबाड लांडग्याचं पिल्लू' असं म्हटलं, यावरुन आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवरांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरु देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही. दिसतील तिथे त्यांना चोप देऊ, अशी आक्रमक भूमिका अजित पवार समर्थकांनी घेतली आहे. यामिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं होतं. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला होता. पण अजित पवार यांचा उल्लेख मात्र या पत्रात करण्यात आलेला नव्हता. याबाबत प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले की, "अजित पवारांना आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे. त्यामुळे त्यांना पत्र लिहिण्याचा विषय नाही. ते आमच्यासोबत असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे."

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पडळकर यांच्या विरोधात जागोजागी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हा वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी