राजकीय

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी

अडचणीत सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

वृत्तसंस्था

शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने अडचणीत सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू-नुकसानीच्या दाव्यात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना ५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच संजय राऊत यांनी किरीट यांच्यासह त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला. मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होत.तबनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून १०० कोटींचा हा घोटाळा झाला आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण