राजकीय

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना चार पानी पत्र लिहिले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक सुरू असताना अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीत अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना चार पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात लवली यांनी काँग्रेसचे दिल्लीचे सरचिटणीस (दीपक बाबरिया) यांच्यासोबत मदभेत आणि पक्षाने आम आदमी पार्टीसोबत केलेल्या युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

अरविंदर सिंग लवली यांनी पत्रात लिहिले की, मी हे पत्र अतिशय जड अंतःकरणाने लिहित आहे. मला पक्षात पूर्णपणे असहाय्य वाटू लागले आहे. त्यामुळे मी आता दिल्ली अध्यक्षपदावर राहू शकत नाहीत. मला दिल्लीचा अध्यक्ष बनवल्यापासून वरिष्ठ पदावर कोणाचीही नियुक्ती करण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप लवली यांनी केला आहे. लवली यांनी बाबरिया यांच्याबाबत पत्रात म्हटले, बाबरिया यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, ज्या नेत्यांनी बाबरियांना विरोध केला. त्या नेत्यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली, असे ते म्हणाले.

अरविंदर सिंग लवली म्हणाले, मी एकाने अनुभवी नेत्याची मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली होती, परंतु दिल्ली प्रभारींनी ती विनंती फेटाळून लावली. दिल्ली प्रभारींनी अद्याप ब्लॉक प्रभारी नियुक्त करण्याची परवानगीही दिलेली नाही. त्यामुळे दिल्लीतील १५० ब्लॉकमध्ये आतापर्यंत प्रभारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत.

पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा केला सन्मान

अरविंदर सिंह लवली यांनी आपच्या युतीबाबत म्हणाले, दिल्ली काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून आम आदमी पार्टीची स्थापन केली. त्या पक्षाचे अर्धे कॅबिनेट मंत्री सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यानंतरही पक्षाने काँग्रेसने आम आदमी पार्टीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षाच्या अंतिम निर्णयाचा आम्ही आदर केला. मी केवळ या निर्णयाचे जाहीर समर्थन केले नाही. तर, हाय कर्मांडच्या अंतिम आदेशानुसार, राज्य युनिट कार्य करेल याचीही खात्री केली. दिल्ली प्रभारींच्या सूचनेनुसार, अटकेच्या रात्री मी सुभाष चोप्रा आणि संदीप दीक्षित यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या घरीही गेलो होतो. तथापि, या विषयावर माझे मत पूर्णपणे वेगळी होती."

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी