राजकीय

देवेंद्र फडणवीसांनी टोचले गोपीचंद पडळकरांचे कान, म्हणाले...

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत.

नवशक्ती Web Desk

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावर आपली प्रितिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि आमदारांनी तिन्ही पक्षांतील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करु नये, असं माझं स्पष्ट मत आहे."

काय आहे नेमकं प्रकरण

काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांवर जहरी टीका केली होती. यामुळे अजित पवार आणि भाजप यांच्यात ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पडळकर यांनी अजित पवार यांची भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांगग्याचं पिल्लू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र लिहिलं नाही. तसंच पुढेही लिहण्याची आवश्यकता वाटत नाही. आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना आम्ही पत्र दिलं आहे, असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान