राजकीय

"शरद पवार भंडाऱ्यात आल्यास त्यांच्या स्वागताला जाणार", प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

येवला, बीडनंतर आता कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

नवशक्ती Web Desk

अजित पवार यांनी शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांना गळाला लावत राष्ट्रवादीतून बंड करत भाजप प्रणित राज्य सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आमचाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आणि आगामी निवडणुका या घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी या नावावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी राज्यभर आपले दौरे सुरु करत पक्षाच्या नव्यानं बांधनी करण्याचं काम सुरु केलं. अशात शरद पवार यांचे एकेकाळी विश्वासू म्हणून ओळख असलेले प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांनी मैदानादत उतरत सभांचा धडाका सुरु केला आहे. नाशिकच्या येवल्यातून पवारांनी बंडखोरांविरोधात दंड थोपटले आहेत. यानंतर दुसरी सभा बीडमध्ये घेत धनंजय मुंडेना आव्हान उभं करण्याचं काम पवरांनी केलं. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या नंतर शरद पवार यांनी आपला मोर्चा कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांकडे वळवला आहे. उद्या कोल्हापूर येथे शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात

आलं आहे.

कोल्हापूरातील सभेनंतर शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ला असलेल्या भंडाऱ्यात सभा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर भंडाऱ्यात सभा झाली तर स्वत: प्रफुल्ल पटेल पवारांच्या स्वागताला जाणार आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच भंडाऱ्यात पोहचले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवारांची सभा भंडाऱ्यात झाल्यास त्यांच्या सभेला गर्दी झाली पाहीजे. कार्यकर्त्यांनी आवर्जून सभेला जावं. असं आवाहन पटेल यांनी केलं. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

यावेळी बोलताना पटेल म्हणाले की, शरद पवार जिल्हात आले तर त्यांच्या स्वागतासाठी मी जाणार आहे. तु्म्हीही या, आपण मिळून जावू आणि त्यांचं स्वागत करु. पटेल पुढे म्हणाले की, साहेबांच्या सभेला आपल्याशिवाय कुणीही गर्दी करु शकत नाही आणि भाषणामध्ये जर ते माझ्याविरोधात बोलले तरी ऐकून घेऊ, असा टोला त्यांनी लगावला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी