राजकीय

खर्गे किंवा राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार ; शशी थरूर यांची परस्पर घोषणा

जनता एनडीए आणि मित्रपक्षांना सत्तेतून खाली खेचून इंडिया आघाडीला सत्तेत आणेल, अशी आशा शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी

थिरुवनंतपुरम : इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्धार केला असला तरी आघाडीचा सर्वमान्य पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे शिताफीने टाळले असताना काँग्रेस पक्षातील काही नेते मात्र परस्पर पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करीत आहे. यामुळे आघाडीत गोंधळ उडण्याची शक्यताच अधिक वाटू लागली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शशी थरूर यांनी इंडिया आघाडी सत्तेत आली तर आपला पक्ष कदाचित राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे नामांकन देर्इल, अशी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल आर्श्चयकारक लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. जनता एनडीए आणि मित्रपक्षांना सत्तेतून खाली खेचून इंडिया आघाडीला सत्तेत आणेल, अशी आशा शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे.

शशी थरूर अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीतील वे डॉटकॉमचे अनावरण केल्यानंतर अमेरिकेतील व्यावसायिकांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले की, आता आपण थांबून वाट पाहायची आहे. मतमोजणीनंतरचे चित्र रंगवताना ते म्हणाले की, हे आघाडीचे राजकारण आहे. तेव्हा एकदा का निकाल लागले की पक्षांनी एकत्र बसून एक नाव ठरवण्याची गरज आहे. पण माझ्या अंदाजानुसार तो काँग्रेस पक्षाचाच असेल, एकतर राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे. खर्गे झाले तर ते पहिले दलित पंतप्रधान असतील किंवा राहुल गांधी असतील, कारण हा पक्ष कुटुंबाकडूनच चालवला जातो. थरूर हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी आपल्यावर जी जबाबदारी देण्यात येर्इल ती आपण प्रमाणिकपणे पार पाडू, असे विधान देखील यावेळी केले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?