PTI
राजकीय

Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? बघा महाराष्ट्रातील मंत्रिपपदांची संभाव्य यादी

Tejashree Gaikwad

PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७:१५ वाजता राष्ट्रपती भवनात भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक शपथविधी समारंभाच्या आधी नवनिर्वाचित खासदारांची काही नावे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजच्या सोहळ्यात ३० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया आणि जेडीचे नेते एचडी कुमारस्वामी यांसारखे अनुभवी नेते आज पदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे.

नरेंद्र मोदींसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची चर्चित यादी

  • अमित शहा - भाजप

  • राजनाथ सिंह - भाजप

  • ज्योतिरादित्य सिंधिया - भाजप

  • अर्जुन राम मेघवाल - भाजप

  • जितेंद्र सिंह - भाजप

  • किरेन रिजुजू - भाजप

  • मनसुख मांडविया - भाजप

  • अश्विनी वैष्णव - भाजप

  • हरदीप पुरी - भाजप

  • जी किशन रेड्डी - भाजप

  • हरदीप सिंग पुरी - भाजप

  • शिवराज सिंह चौहान - भाजप

  • राव इंद्रजित सिंग - भाजप

  • शंतनू ठाकूर - भाजप

  • बंदी संजय - भाजप

  • बीएल वर्मा - भाजप

  • शोभा करंदलाजे - भाजप

  • रवनीत सिंग बिट्टू - भाजप

  • सर्बानंद सोनोवाल - भाजप

  • मनोहर लाल खट्टर - भाजप

  • हर्ष मल्होत्रा ​​- भाजप

  • नित्यानंद राय - भाजप

  • अजय तमटा - भाजप

  • सावित्री ठाकूर - भाजप

  • धर्मेंद्र प्रधान - भाजप

  • निर्मला सीतारामन - भाजप

  • राम मोहन नायडू किंजरप्पू - तेलुगु देसम पार्टी

  • चंद्रशेखर पेम्मासानी - तेलुगु देसम पार्टी

  • अनुप्रिया पटेल - अपना दल

  • जयंत चौधरी - राष्ट्रीय लोकदल

  • जीतन राम मांझी - हिंदुस्थानी अवाम मोर्चा

  • राम नाथ ठाकूर - जनता दल (संयुक्त)

  • चिराग पासवान - लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)

  • एचडी कुमारस्वामी - जनता दल (धर्मनिरपेक्ष)

महाराष्ट्रात कोणाला मंत्रिपद मिळू शकते?

  • प्रतापराव जाधव - शिवसेना

  • नितीन गडकरी - भाजप

  • रक्षा खडसे - भाजप

  • रामदास आठवले - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

  • मुरलीधर मोहोळ- भाजप

  • पियुष गोयल - भाजप

शपथविधीला हजेरी लावणारे पाहुणे

पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे.

५ वाजल्यापासून राष्ट्रपती भवनात पाहुण्यांचे आगमन सुरू होईल, शपथविधी सोहळा ७.१५ वाजता सुरू होणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस