Prime Minister Narendra Modi Casts His Vote, First Visuals Out ANI
राजकीय

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

Tejashree Gaikwad

Prime Minister Narendra Modi Casts His Vote: आज, ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. गुजरातमध्ये २५ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान सुरू आहे. पांढरा कुर्ता आणि भगवे नेहरू जाकीट परिधान करून मोदी यांनी गांधीनगर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या राणीप परिसरातील अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे गुजरातमधील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

साधला लोकांशी संवाद

मतदान करून केंद्राबाहेर आल्यानंतर मोदींनी लोकांना अभिवादन केले. पंतप्रधानांनी यावेळी लोकांशी संवादही साधला. मतदान केंद्राबाहेर जमलेल्या लोकांना त्यांनी ऑटोग्राफही दिला. "आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. मी प्रत्येकाला या लोकशाहीत मतदान करण्याचे आवाहन करतो. निवडणूक प्रचार आणखी तीन ते चार आठवडे चालेल. मी नेहमीच इथे गुजरातमध्ये मतदान करतो. इथे भाजपचा उमेदवार म्हणून अमित शहा निवडणूक लढवत आहेत. इथे मी काल आंध्र प्रदेशातून आलो आणि आज मला मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा इथे जावे लागेल," असे त्यांनी मतदान केल्यावर सांगितले.

लोकशाहीचा सण साजरा करा

"भारताची निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन हे जगातील लोकशाहीसाठी शिकण्यासारखे एक उदाहरण आहे. जगातील मोठ्या विद्यापीठांनी केस स्टडी करायला हवी," असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. "जवळपास ६४ देशांमध्ये निवडणुका आहेत आणि त्या सर्वांची तुलना व्हायला हवी. हे वर्ष लोकशाहीच्या उत्सवासारखे आहे... मी पुन्हा देशवासियांना सांगतो की, मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाहीचा सण साजरा करा."

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस