PTI
राजकीय

एनडीएच्या खासदारांची आज बैठक, नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करणार

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआच्या नव्या खासदारांची बैठक शुक्रवारी येथे होण्याची शक्यता असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआच्या नव्या खासदारांची बैठक शुक्रवारी येथे होण्याची शक्यता असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

एनडीएचे नेते म्हणून मोदी यांची निवड झाल्यानंतर तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार हे एनडीएतील ज्येष्ठ नेते मोदी यांच्यासमवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यास जाणार असून त्यांना खासदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करणार आहेत.

मोदी येत्या रविवारी म्हणजे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चा केली. घटक पक्षातील कोणाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावयचा, भाजपमधील कोणला संधी द्यावयाची यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

जागतिक नेत्यांची उपस्थिती

या सोहळ्याला अनेक देशांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात श्रीलंका, नेपाळ, मॉरिशसच्या राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पदहल आदी नेते या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार असल्याचे समजते.

पंतप्रधानपदाचा ९ जूनला शपथविधी

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी पद व गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. यापूर्वी हा शपथविधी सोहळा ८ जून रोजी होणार होता. मात्र, ९ हा आकडा शुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळेच हा सोहळा ९ जून रोजी ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या सोहळ्याला ८ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी