पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल!

नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

 
राजकीय

पंतप्रधान मोदी स्वत: 'झूठ का बाजार' ; नाना पटोलेंचा मोदींवर पलटवार

मोदी काँग्रेस बद्दल नाही तर स्वत:बद्दल बोलत होते, असं देखील नाना पटोले म्हणाले

नवशक्ती Web Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' या कॅम्पेनला जोरदार उत्तरदेत राजस्थानच्या बिकानेर येथील सभेत काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस म्हणजे 'लूट की दुकान, झूठ का बाजार' असं म्हटलं आहे. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर जोरदार पलटवार केला आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: 'झूट का बाजार' आहेत, हे आता लपून राहीलेलं नाही हे वास्तव आहे. हे सर्वसामान्यांना देखील माहिती आहे. ते काँग्रेस बद्दल नाही तर स्वत:बद्दल बोलत होते." असा पलटवार नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

राजस्थानच्या बिकानेर येथील सभेत मोदी म्हणाले की, राजस्थानचे शेतकरी काँग्रेसच्या सरकारला वैतागलेले आहेत. काँग्रेसचं सराकर आलं तेव्हापासून त्यांनी काय केलं. मागील चार वर्षापासून अंतर्गत कुरघोड्या सुरु आहेत. एकमेकांचे पाय ओढणं सुरु आहेत.

यावेळी त्यांनी केंद्राने पाठवलेल्या अनेक योजना काँग्रेसनं राबवल्या नसल्याचं म्हणत. काँग्रेसनं राजस्तानच्या समस्यांकडे कधी लक्ष दिलं नाही असं म्हटलं आहेत. तसंच काँग्रेस म्हणजे 'लुट की दुकान, झूठ का बाजार' आहे, अशी टिका मोदी यांनी काँग्रेसवर केली होती.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी