राजकीय

शरद पवारांनी अजित पवार गटाला ठणकावलं ; म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा..."

निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचं कारण नाही, असा धीर देखील शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हावर आपला हक्का सांगण्यात आला. यानंतर हा वाद निवडणुक आयोगातच्या दारात पोहचला. अशात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच असल्याचं शरद पवार गटकाडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाचं आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावा प्रस्ताव दिला आहे, अशा शब्दात अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठणकावलं.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माजी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्या सह्या आगहेत असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विस्तारित कार्य समितीची आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचं कारण नाही. पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निडवणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजून लागेल. देशाचं राजकारण बदलत आहे. अनेक राज्यात आज भाजप सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत