राजकीय

शिंदे-अजित पवार गटाचा भाजपवर वाढता दबाव; विधानसभा तिकीट वाटप

लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये वरचष्मा ठेवण्यात यशस्वी झालेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात मात्र चांगलेच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने आखली आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये वरचष्मा ठेवण्यात यशस्वी झालेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात मात्र चांगलेच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (शिंदे) गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाला १०० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे महायुतीमधील घटक पक्ष आहेत. विधानसभेची आगामी निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

शिंदे गटाला किमान १०० जागा मिळावयास हव्यात आणि त्यापैकी ९० जागा आम्ही जिंकू, असे रामदास कदम म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षाला ८०-९० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने विधानसभेत आम्हीच जास्त जागा लढविणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत