राजकीय

डोंबिवलीतील शिंदेना शुभेच्छा देणारे बॅनर नक्की कोणाचे ?

शंकर जाधव

स्व.आनंद दिघेंनंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात भगवा फडकविण्यास एकनाथ शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. शिवसेनेतील अत्यंत महत्वाचा चेहरा समजल्या जाणाऱ्या शिंदेच्या राजकीय रणनीतीने ठाणे जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेची सत्ता आली. २०१९ ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अडीच वर्ष सरकारला पूर्ण झाले. मात्र शिंदेंनी आपली नाराजी स्पष्ट करत ४० आमदारांना घेऊन आधी सुरत नंतर आसामला गेले. या राजकीय भूकंपाने राज्यातील अनेक शहरात शिवसैनिकांनी आपली मते व्यक्त केली. परंतु कल्याण- डोंबिवलीतील शिवसैनिकांनी चुप्पी साधली असल्याने त्याच्या मनात नेमक काय चाललय याची उत्सुकता सर्वाना लागून लागली आहे. शिंदेंच्या बंडाला ४८ तास उलटल्यावर डोंबिवलीतील शिंदेंना शुभे देणारे बॅनर लावण्यात आले. मात्र शिंदेना शुभेच्छा देणारे बॅनर नक्की कोणाचे ... शिंदे समर्थकांचे कि शिवसैनिकांचे ? असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.

डोंबिवलीतील अनेक ठिकाणी लागलेल्या बॅनर मध्ये नमूद केले आहे कि,`लोकांचा लोकनाथ एकनाथ...शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे मा.श्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा ! .. साहेब आगे बढो, हम आपके साथ हे !..` या बॅनरखाली राजेश कदम, सागर जेधे, दिपेश भोसले आणि राजेश मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र एकाचे शिवसेनेतील पद लिहिले नाही. वास्तविक या बॅनरमध्ये शहरप्रमुखाचे नाव व पद असणे आवश्यक होते. मात्र तसे दिसत नसल्याने हे बॅनर नक्की कोणाचे... शिंदे समर्थकांचे कि शिवसैनिकांचे ? असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.

याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले, समर्थक म्हणून आम्ही हे बॅनर लावले आहेत. आमचा शिंदेंना पाठिंबा आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविलेले हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकांना काम करण्यास जोम देतात. शिवसेनेत सत्तेत असताना सरकारमधील इतर दोन पक्ष अन्याय करत असल्याच्या अनेक तक्रारी शिंदेंकडे आल्या होत्या.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण