क्रीडा

महाराष्ट्र कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

प्रतिनिधी

महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी तातडीने बरखास्त करून नव्याने कमिटी नियुक्त करण्याच्या करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संघाचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावतीने अ‍ॅड. संजीव कदम आणि अ‍ॅड. अक्षय कपाडीया यांनी दाखल केलेल्या या याचिकेची न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत शुक्रवार, २९ जुलैला सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे.

राष्टीय कुस्तीगीर संघाने ३० जूनच्या बैठकीत महाराष्ट कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तीन सदस्यांची तात्पुरती कमिटी नियुक्त केली. या काळजीवाहू कमिटीने तातडीने निवडणूक जाहीर करून विनविरोध कमिटी जाहीर केली. या विरोधात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावतीने अ‍ॅड. संजीव कदम आणि अ‍ॅड. अक्षय कपाडीया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठा समोर गुरुवारी प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. संजीव कदम यांनी राष्टीय कुस्तीगीर संघाच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला. अशाप्रकारे संघ बरखासत करण्याचा कोणताही अधिकार राष्ट्रीय संघाला नाही, असा दावा करून राष्ट्रीय संघाची घटनाच न्यायालयात सादर केली.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम