संग्रहित छायाचित्र @CricCrazyJohns
क्रीडा

आंद्रे रसेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यांनंतर होणार निवृत्त

३७ वर्षीय अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांनंतर तो निवृत्त होणार आहे.

Swapnil S

बार्बाडोस : ३७ वर्षीय अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांनंतर तो निवृत्त होणार आहे. मात्र जगभरातील विविध फ्रँचायझी टी-२० लीगमध्ये रसेल खेळत राहणार आहे.

२०१०मध्ये विंडीजसाठी पदार्पण करणाऱ्या रसेलने १ कसोटी, ५६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. विंडीजच्या २०१२ व २०१६च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा रसेल भाग होता. मात्र गेल्या काही वर्षांत विंडीज क्रिकेट मंडळात सुरू असलेले राजकारण आणि अन्य वादांमुळे रसेल फक्त फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसायचा. आता २३ जुलै रोजी घरच्या मैदानात किंग्स्टन येथे रसेल अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसेल.

“वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न होते. गेली १५ वर्षे मी हे स्वप्न जगलो. देशासाठी विश्वचषकही जिंकता आल्याचे समाधान आहे. मात्र आता थांबण्याची वेळ आली असून घरच्या प्रेक्षकांसमोरच अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मी आतुर आहे,” असे रसेल म्हणाला.

उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या रसेलने २०१६च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताविरुद्ध छाप पाडली होती. गेल्या दशकभरापासून रसेल आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा अविभाज्य घटक म्हणून उदयास आला आहे.

Instamart वरून आता एलपीजी सिलिंडरची होम डिलिव्हरी; स्विगीची HPCL सोबत भागीदारी, कनेक्शनशिवाय करता येणार ऑर्डर

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार