क्रीडा

महाराष्ट्राच्या कॅरमपटूसाठी आर्थिक सहाय्यचे आवाहन

प्रतिनिधी

महाराष्ट्राचा कॅरमपटू संदीप दिवेची ८व्या जागतिक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मलेशिया येथे रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी संदीपला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आर्थिक सहाय्य केले असून त्याला अधिक मदतीची गरज आहे.

हॉटेल बेव्हियू, लंगकावी येथे जागतिक स्पर्धा खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघात प्रत्येकी चार पुरुष आणि महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी वाराणसी येथे झालेल्या फेडरेशन चषक व यंदा मुंबई येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील कामगिरीनुसार हा संघ निवडण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचा प्रशांत मोरे, पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची काजल कुमारी, जैन इरिगेशनची निलम घोडके आणि संदीप असे चार महाराष्ट्राचे खेळाडू या संघात आहेत. तर अब्दुल रेहमान, देबजानी तामूली, के. श्रीनिवास आणि रश्मी कुमारी यांनाही भारतीय संघात स्थान लाभले आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूला ७० हजार रुपये खर्च येणार असून अन्य सर्व खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत ज्या व्यावसायिक कंपनीचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्याकडून खेळाडूंचा खर्च करण्यात येणार आहे. परंतु वयाची तिशी ओलांडलेला संदीप महाराष्ट्राकडून खेळत असून त्याला नोकरीही नसल्याने या स्पर्धेसाठी पैसे जमा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कॅरम संघटनेने त्याला ३५ हजार रुपयांची मदत केली असून मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनासुद्धा १५ हजार रुपये देणार आहे. संदीपला अद्यापही २० हजार रुपयांची आ‌वश्यकता असल्याने त्याला मदत करण्याचे आवाहन कॅरमप्रेमींना करण्यात आले आहे.

भारतीय संघ

पुरुष : अब्दुल रेहमान (उत्तर प्रदेश), प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक), के. श्रीनिवास (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), संदीप दिवे (महाराष्ट्र).

महिला : काजल कुमारी (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), रश्मी कुमारी (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), निलम घोडके (जैन इरिगेशन), देबजानी तामूली (डिफेन्स अकाउंट्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस