जोफ्रा आर्चर मालिकेबाहेर; पोपच्या जागी बेथल इंग्लंडच्या संघात  
क्रीडा

The Ashes: जोफ्रा आर्चर मालिकेबाहेर; पोपच्या जागी बेथल इंग्लंडच्या संघात

२०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. यावेळी मात्र कांगारूंनी मालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. दरम्यान, पॅट कमिन्स मालिकेबाहेर गेल्याने स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

Swapnil S

मेलबर्न : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा दुखापतीने सतावले आहे. डाव्या बाजूचे स्नायू ताणले गेल्यामुळे आर्चर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांना मुकणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने अपयशी ठरलेल्या ओली पोपच्या जागी डावखुरा फलंदाज जेकब बेथलला संधी देण्यात आली आहे.

२६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी बॉक्सिंग डे कसोटी सुरू होईल. उभय संघांतील या पाच लढतींच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ११ दिवसांतच ही मालिका जिंकली आहे. त्यांनी पहिली कसोटी दोन दिवसांत, दुसरी कसोटी चार दिवसांत, तर तिसरी कसोटी पाच दिवसांत जिंकली. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंवर टीकेचा भडिमार होत आहे.

१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. यावेळी मात्र कांगारूंनी मालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. दरम्यान, पॅट कमिन्स मालिकेबाहेर गेल्याने स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू