Photo : X (@khurram333)
क्रीडा

Asia cup 2025 : पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्यावर पाकिस्तान राजी

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान क्रिकेट संघाचे वेगळेच नाटक पाहायला मिळाले. भारताविरुद्धच्या लढतीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नकार दिल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाविरुद्धचा सामना न खेळण्याचे ठरवले होते. मात्र पायक्रॉफ्ट यांनी कृत्याविषयी माफी मागितल्यावर ते हा सामना खेळण्यासाठी तयार झाल्याचे समजते.

Swapnil S

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान क्रिकेट संघाचे वेगळेच नाटक पाहायला मिळाले. भारताविरुद्धच्या लढतीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नकार दिल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाविरुद्धचा सामना न खेळण्याचे ठरवले होते. मात्र पायक्रॉफ्ट यांनी कृत्याविषयी माफी मागितल्यावर ते हा सामना खेळण्यासाठी तयार झाल्याचे समजते.

१४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता अखिलाडूवृत्ती दाखवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरोधात तक्रार नोंदवली होती. तसेच या लढतीचे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. मात्र आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावली. तसेच भारताच्या कृतीवर कोणतीही कारवाई केली नाही.

पायक्रॉफ्ट यांच्या सांगण्यावरून नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीशी हस्तांदोलन केले नाही, असे समजते. तसेच भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतरही हस्तांदोलन करणार नाही, असे त्यांना कळवले होते. क्रिकेटमध्ये नाणेफेक झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपापसात अंतिम ११ खेळाडूंची यादी लिहिलेला कागद अदलाबदल करतात. मात्र दोन्ही कर्णधारांनी ते केले नाही. सूर्यकुमारने आपला कागद पायक्रॉफ्ट यांच्याकडे सोपवला.

त्यामुळे पीसीबीने पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई न करण्यात आल्याने यूएईविरुद्ध आपण खेळणार नाही असे सांगितले. तसेच आशिया चषकातूनही ते माघार घेणार, असे वाटू लागले. सामन्याच्या दोन तास आधी दोन्ही संघांनी स्टेडियमवर पोहोचणे आवश्यक असते. मात्र नाणेफेकीसाठी अर्धा तास शिल्लक असतानाही पाकिस्तानचे खेळाडू हॉटेलवरच होते. परिणामी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचे पीसीबीने निवेदनात स्पष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ लढतीसाठी मैदानात दाखल झाला.

बांगलादेशचे आव्हान शाबूत

अबूधाबी : डावखुरा फिरकीपटू नसूम अहमद (११ धावांत २ बळी) आणि अनुभवी मुस्तफिझूर रहमान (२८ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे बांगलादेशने ब-गटात अफगाणिस्तानवर रोमहर्षक लढतीत ८ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना तांझिद हसनच्या (५२) अर्धशतकामुळे बांगलादेशने २० षटकांत ५ बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत १४६ धावांत गारद झाला. बांगलादेशचा हा ३ सामन्यांतील दुसरा विजय ठरला. तर अफगाणिस्तानला गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य असेल. श्रीलंकेने दोनपैकी दोन लढती जिंकलेल्या आहेत, त्यामुळे या गटातून श्रीलंका, अफगाणिस्तान व बांगलादेश या तिघांनाही सुपर-फोर फेरी गाठण्याची संधी आहे.

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

भांडण सोडवल्याची 'शिक्षा'; ४५ दिवस तुरूंगवास भोगल्याचा दावा, म्हणाला - “मैं सेंट्रल जेल से गोरा होकर आया”! तरुणाचा VIDEO व्हायरल

महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

Thane : घोडबंदर घाटात उतरणीवर कंटेनरच्या धडकेमुळे विचित्र अपघात; अनेक वाहने एकमेकांवर आदळली, चालक फरार - Video

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर