क्रीडा

Asian Champions Trophy 2026: चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे सामने मोफत

पंजाबमध्ये २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा हॉकी इंडियाने मंगळवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : पंजाबमध्ये २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा हॉकी इंडियाने मंगळवारी केली.

जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजीत सिंह हॉकी स्टेडियम आणि मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंह सीनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम या दोन मैदानांवर एकूण २० सामने खेळवले जाणार आहेत. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत साखळी फेरीतील सर्व सामने जालंधर येथे होतील. त्यानंतर ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने तसेच पदकांसाठीचे सामने मोहाली येथे खेळवले जातील.

प्रेक्षकांना हॉकी इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून विनामूल्य प्रवेशिका मिळवता येतील. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले, “हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब २०२६ स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अधिकाधिक क्रीडाप्रेमी स्टेडियममध्ये येतील आणि त्यांना उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय हॉकीचा थरार अनुभवता येईल, अशी आम्हाला आशा आहे. हॉकी इंडियाचे महासचिव भोलानाथ सिंह यांनीही दोन्ही ठिकाणच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भारताची सलामी बांगलादेशशी

भारताचा स्पर्धेतील पहिला साखळी सामना २७ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारताचा संघ २९ ऑक्टोबरला चीन, ३० ऑक्टोबरला जपान, १ नोव्हेंबरला मलेशिया आणि २ नोव्हेंबरला दक्षिण कोरियाविरुद्ध खेळणार आहे.

परराज्यातील ४७५ वाहनांवर RTO ची कारवाई; २४.०९ लाखांचा दंड वसूल

Ulhasnagar : एकाच घराला दिवसातून दोनदा आग

सलमान खानने 'बिश्नोईं'ची माफी मागावी - अनुप जलोटा

सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय

सेवानिवृत्त झालेल्या महिलेचा पेन्शनवरील हक्क कायम; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा