Asian Games Golf 2026 : गोल्फमध्ये प्रणवी उर्सचा 'सुवर्ण'गोल X
क्रीडा

Asian Games Golf 2026 : गोल्फमध्ये प्रणवी उर्सचा 'सुवर्ण'गोल

प्रणवी उर्सने शनिवारी इतिहास रचताना आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू होण्याचा मान मिळवला.

Swapnil S

नागोया : प्रणवी उर्सने शनिवारी इतिहास रचताना आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू होण्याचा मान मिळवला.

रात्रभर झोप न लागल्यामुळे आलेला थकवा आणि अंतिम फेरीच्या सुरुवातीला आलेल्या दबावावर मात करत तिने अवघ्या एका स्ट्रोकच्या आघाडीसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताला सांघिक प्रकारात रौप्यपदकही मिळाले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या संघाची ४४ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली गेली.

म्हैसूरच्या २३ वर्षीय प्रणवीने तिसऱ्या होलवर झालेल्या धक्कादायक ट्रिपल बोगीमुळे गमावलेली तीन स्ट्रोकची आघाडी पुन्हा मिळवण्यासाठी तीन बर्डी केल्या. अंतिम फेरीत तिने ७० गुणांची नोंद केली. चार दिवसांनंतर तिचा एकूण स्कोअर १५-अंडर २६५ असा राहिला. तिने प्रतिस्प र्थ्यांवर एका स्ट्रोकची आघाडी घेत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या यिन रुओनिंगने अंतिम फेरीत ६७गुणांसह एकूण २६६ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले, तर सिंगापूरच्या शॅनन टॅनने ६८ गुणांची नोंद करत एकूण २६६ गुण मिळवले.

ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रणवी म्हणाली, "एखादी गोष्ट पहिल्यांदा करणारी व्यक्ती असणे मला आवडते. पुढे अनेक जण त्यापेक्षा अधिक कामगिरी करतील; पण पहिली व्यक्ती नेहमीच पहिली राहते."

अदिती अशोकने भारतासाठी महिला गोल्फमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवताना रौप्यपदक जिंकून इतिहास रचला होता. यावेळी प्रणवीने त्यापुढचे मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत पाऊल टाकत सुवर्णपदक मिळवले. प्रणवीचे सुवर्णपदक है २००२ मध्ये शिव कपूरने पुरुषांच्या वैयक्तिक गोल्फमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले गोल्फ सुवर्ण ठरले. त्यामुळे पुढील वैयक्तिक सुवर्णासाठीची भारताची २४ वर्षांची प्रतीक्षा संपली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट