क्रीडा

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली; न्यूझीलंडवर २५ धावांनी विजय

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले

वृत्तसंस्था

केर्न्स येथील कॅजेली स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५ धावांनी विजय मिळविला. या सामन्यातील शतकवीर स्टिव्हन स्मिथला (१३१ चेंडूंत १०५) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मालिकेत त्याने १६७ धावा केल्याने मालिकावीराचाही मान त्याला मिळाला. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षट्कात ५ बाद २६७ धावा केल्या. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४९.५ षट्कांत २४२ धावांत गारद झाला.

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना...

CBSE चा मोठा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट; नववीतील विद्यार्थ्यांसाठीही नवे नियम

श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी

नोएडातील उंच इमारतीत भीषण आग; एसीचा स्फोट झाल्याचा संशय, Video