क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपन : बसवरेड्डीने जोकोव्हिचला झुंजवले

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला १९ वर्षीय निशेष बसवरेड्डी या भारतीय वंशाच्या अमेरिकने खेळाडूने विजयासाठी घाम फोडला.

Swapnil S

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला १९ वर्षीय निशेष बसवरेड्डी या भारतीय वंशाच्या अमेरिकने खेळाडूने विजयासाठी घाम फोडला. अँडी मरेच्या प्रशिक्षणात नव्या वर्षाची सुरुवात जोकोव्हिचने विजयाने केली आहे.

स्पर्धेचा पहिलाच सेट गमावण्याची वेळ जोकोव्हिचवर आली. सोमवारी झालेल्या या सामन्यात स्टँनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेल्या निशेष बसवरेड्डी या अमेरिकन खेळाडूने पहिल्या सेट ४-६ असा खिशात घातला. दुसरा सेट ६-३ असा खिशात घालत सर्बियन खेळाडूने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर मात्र जोकोव्हिचने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत उर्वरित दोन्ही सेट जिंकत स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने तिसरा सेट ६-४ असा, तर चौथा सेट ६-२ असा सहज जिंकला.

बसवरेड्डीने जोकोव्हिचला चांगलीच टक्कर दिली. बसवरेड्डीने या सामन्यात ड्रॉप शॉट्ससह काही चांगले फटके मारले. त्याने आपल्या खेळाने जोकोव्हिचला प्रभावित केले. बसवरेड्डीचा खेळ परिपूर्ण असल्याचे जोकोव्हिच म्हणाला. त्याने त्याच्या शॉट्सने आणि त्याच्यातील लढाऊ भावनेने मला आश्चर्यचकित केले.

मिचेलसेनकडून सिटसिपासला पराभवाचा धक्का

अमेरिकेच्या ॲलेक्स मिचेलसेनने स्टेफानोस सिटसिपासला पराभवाचा धक्का देत स्पर्धेतील पहिल्या उलटफेरची नोंद केली. मिचेलसेनने पहिल्या सेट ७-५ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेटही ६-३ असा खिशात घालत सामन्यावरची पकड घट्ट केली. तिसरा सेट मात्र सिटसिपासने जिंकत पुनरागमन केले. मात्र त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. मिचेलसेनने अखेरच्या सेटमध्ये ६-४ अशी बाजी मारत सामना आपल्या बाजूने वळवला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस