PM
क्रीडा

ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात; पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त ६६ षटकांचा खेळ

Swapnil S

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) मंगळवारपासून सुरू झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. अंधूक सूर्यप्रकाश आणि पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त ६६ षटकांचाच खेळ शक्य झाला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारली असून मार्नस लबूशेन १२० चेंडूंत नाबाद ४४, तर ट्रेव्हिस हेड १९ चेंडूंत नाबाद ९ धावांवर खेळत आहे.

उभय संघांतील तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० अशी आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी ९० धावांची दमदार सलामी नोंदवली. फिरकीपटू अघा सलमानने वॉर्नरला ३८ धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर हसन अलीने ख्वाजाचा (४२) अडसर दूर केला. २ बाद १०८ वरून स्टीव्ह स्मिथ व लबूशेन यांनी सावध खेळ केला. मात्र स्मिथ पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. आमीर जमालने त्याला २६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर लबूशेन व हेड यांनी आणखी पडझड होऊ न देता उर्वरित षटके खेळून काढली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस