क्रीडा

पाकिस्तानच्या टी-२० संघातून बाबर, रिझवान यांना वगळले

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अपयशानंतरही पाकिस्तानच्या निवड समितीने एकदिवसीय संघात मोठे बदल करणे टाळले असले, तरी टी-२० संघात युवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अपयशानंतरही पाकिस्तानच्या निवड समितीने एकदिवसीय संघात मोठे बदल करणे टाळले असले, तरी टी-२० संघात युवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांना पाकिस्तान संघातून डच्चू देण्यात आला आहे.

उदयोन्मुख अष्टपैलू सलमान अली अघाची टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अनुभवी लेग-स्पिनर शादाब खानचेही पाकिस्तान संघात पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. मायदेशात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतरही एकदिवसीय संघाचे नेतृत्व रिझवानकडे कायम ठेवण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत व न्यूझीलंडने पाकिस्तानला साखळीत नमवले.

सौद शकील, कामरान घुलाम, शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांना मात्र एकदिवसीय मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ १६ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

पाकिस्तानचे संघ

एकदिवसीय : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली अघा, अब्दुल्ला शफिक, बाबर आझम, अबरार अहमद, अकिफ जावेद, फहीम अश्रफ, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफियान मुकीम, तय्यब ताहीर.

टी-२० : सलमान अली अघा (कर्णधार), शादाब खान, अब्दुल समद, अबरार अहमद, हॅरिस रौफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, उस्मान खान.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हातावर वेदना...

ऐन दिवाळीत मुलाचा अपघाती मृत्यू; पण पालकांचा उदात्त निर्णय; सत्यम दुबे ठरला वसईतील सर्वात तरुण अवयवदाता!

बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलिस कोठडी

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार