@ICC
@ICC
क्रीडा

ICC T20 World Cup 2022 : तुम्हाला माहिती आहे का? यंदाची विश्वचषक स्पर्धा ठरली सर्वाधिक अनपेक्षित निकाल देणारी स्पर्धा!

प्रतिनिधी

यंदाचा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2022) ही अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. फक्त भारतीय संघाच्या कामगिरीमुळेच नव्हे तर या स्पर्धेत झालेल्या अनपेक्षित निकालांमुळे पण ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींच्या चांगल्याच लक्षात राहणार आहे. कारण यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल ६ अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. हे आत्तापर्यंतच्या टी-२० विश्वचषक स्पर्धांच्या इतिहासात सर्वाधिक अनपेक्षित निकाल ठरले.

नामिबियाने श्रीलंकेवर मिळवला दणदणीत विजय

आयसीसी टी-२० विश्वचषकच्या सुरुवातीच्या ग्रुप स्टेजमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामिबिया संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. नामिबिया संघाने पहिली फलंदाजी करताना १६३ धाव केल्या. मात्र, श्रीलंकेला १०८ धावांमध्ये गुंडाळत स्पर्धेची सुरुवातच धमाकेदार केली.

स्कॉटलंडने हरवले वेस्ट इंडिजला

वेस्ट इंडिजच्या संघाने दोनवेळा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. मात्र यावर्षी त्यांची कामगिरी अत्यंत खराब झाली. ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात त्यांना स्कॉटलंडकडून पराभवाचा लाजिरवाणा सामना करावा लागला. स्कॉटलंडने पहिली फलंदाजी करताना १६० धावा केल्या, मात्र वेस्ट इंडिजचा संघ ११८मध्येच सर्वबाद झाला.

आयर्लंडने वेस्ट इंडिजला दाखवला घराचा रस्ता

विश्वचषक स्पर्धेचे तगडे दावेदार मानला जाणारा वेस्ट इंडिज संघ 'फायनल १२'मध्येही स्थान मिळवू शकला नाही. ग्रुप स्टेजमध्ये स्कॉटलंड सारख्या दुबळ्या संघासोबत पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्यांना आयर्लंड संघाकडूनही पराजय पत्करावा लागला. आयर्लंडने तब्बल ९ विकेट्सनी वेस्ट इंडीजवर मात केली.

आयर्लंडने केली तंगड्या इंग्लड संघावर मात

अंतिम १२मध्ये आयर्लंडने इंग्लंड संघावर मात केली आणि पुन्हा एकदा इंग्लडला धक्का दिला. यापूर्वी २०११च्या विश्वचषकमध्येही आयर्लंडने इंग्लंडवर मात केली होती. या विजयाने पुन्हा एकदा आयर्लंडने सिद्ध केले की, आम्हीदेखील चांगल्या दर्जाचे क्रिकेटपटू आहोत.

झिम्बाब्वेने पाकिस्तानवर मिळवला रोमहर्षक विजय

क्रिकेटच्या इतिहासात झिम्बाब्वेने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय हा झिम्बाब्वेसाठी सर्वोत्तम मानला जाईल. अगदी शेतीच्या चेंडूंमध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला धूळ चरत सामना अवघ्या एका धावेने जिंकला होता. यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

नेदरलँडने चारली दक्षिण आफ्रिकेला धूळ

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात अनपेक्षित निकाल म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडने पराजित केले. यामुळे दक्षिण आफ्रिका अखेरच्या क्षणी स्पर्धेच्या बाहेर पडली आणि पाकिस्तानला सेमी फायनलच तिकीट मिळालं. पाकिस्तानसाठी हा चमत्कारच ठरला.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा