क्रीडा

भारतीय बॉक्सिंग महासंघाची निवडणूक तूर्तास लांबणीवर

भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) २८ मार्च रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) २८ मार्च रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महासंघाची निवडणूकही लांबणीवर पडली आहे.

बीएफआयची निवडणूक फेब्रुवारीत अपेक्षित होती. मात्र त्यावेळी ती होऊ न शकल्याने मार्चमध्ये ढकलण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने महासंघावर कारवाई करणे टाळून त्यावरील बंदी उठवली. मात्र महासंघाने आयओएवर अन्य समिती नेमली. याविरोधात महासंघाने आवाज उठवला होता.

गेल्या काही काळापासून भारतीय बॉक्सिंग विविध कारणांनी चर्चेत आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे बॉक्सिंगपटू आणि बॉक्सिंगशी निगडीत अन्य घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल