लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराने त्याचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्लंडला या लढतीत बुमराच्या अफलातून कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागल्याचे मत माजी क्रिकेटपटू नासीर हुसैनने मांडले आहे.
“बुमराचा पहिल्या डावातील स्पेल दोन्ही संघांमधील फरक ठरला. भारताचे फिरकीपटू अपयशी ठरत असताना बुमराने पूर्णपणे सपाट खेळपट्टीवर केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. इंग्लंडचे फलंदाज त्याच्यापुढे पार निष्प्रभ ठरले. इंग्लंडकडून कोणीही बुमरासारखी गोलंदाजी करू शकले नाही,” असे हुसैन म्हणाला.