@ICC
क्रीडा

दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तानमध्ये आज कराचीत कांटे की टक्कर

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी होणाऱ्या ब-गटातील लढतीत दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानचे कडवे आव्हान असेल. या लढतीत चाहत्यांना थरार अपेक्षित आहे.

Swapnil S

कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी होणाऱ्या ब-गटातील लढतीत दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानचे कडवे आव्हान असेल. या लढतीत चाहत्यांना थरार अपेक्षित आहे.

२०२४च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत आफ्रिकेने अफगाणिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हश्मतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अफगाणिस्तानचा संघ उत्सुक असेल. फिरकीपटू रशिद खान, नूर अहमद यांच्यावर अफगाणिस्तानची गोलंदाजी अवलंबून आहे. फलंदाजीत रहमनुल्ला गुरबाझ, रहमात शाह व अझमतुल्ला ओमरझाई यांच्याकडून अफगाणिस्तानला आशा आहेत. अफगाण संघ प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे.

दुसरीकडे टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेला यंदा जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर असे धडाकेबाज फलंदाज आफ्रिकेच्या ताफ्यात आहेत. कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी यांची वेगवान जोडी आणि केशव महाराज, तबरेझ शम्सी यांची फिरकी जोडी आफ्रिकेची ताकद आहे. त्यामुळे कराचीमध्ये दोन्ही संघ विजयारंभासाठी आतुर असतील.

सामना क्र. ३

द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान

स्थळ : द नॅशनल बँक स्टेडियम, दुबई

वेळ : दुपारी २.३० वा.

प्रतिस्पर्धी संघ

अफगाणिस्तान : हश्मतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रहमनुल्ला गुरबाझ, रहमत शाह, अझमतुल्ला ओमरझाई, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, रशिद खान, नूर अहमद, नांगेलिया खरोटे, नवीद झादरान, फझलहक फारुकी, सेदिउल्ला अटल, इक्रम अलिखिल, फरीद अहमद.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बाव्हुमा (कर्णधार), रायन रिकेलटन, रासी वॅन डर दुसेन, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, टॉनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बोश, वियान मल्डर.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओहॉटस्टार ॲप

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती