क्रीडा

गॉफला महिला एकेरीचे विजेतेपद; फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा

अमेरिकेची दुसरी मानांकित कोको गॉफने बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंकाला अंतिम सामन्यात शनिवारी ७-६, २-६, ४-६ असे पराभूत करत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पहिल्यांदाच पटकावले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत पहिला सेट पिछाडीवर पडूनही गॉफने सामन्यात पुनरागमन करून जेतेपदावर मोहर उमटवली.

Swapnil S

पॅरिस : अमेरिकेची दुसरी मानांकित कोको गॉफने बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंकाला अंतिम सामन्यात शनिवारी ७-६, २-६, ४-६ असे पराभूत करत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पहिल्यांदाच पटकावले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत पहिला सेट पिछाडीवर पडूनही गॉफने सामन्यात पुनरागमन करून जेतेपदावर मोहर उमटवली.

पहिला सेट सबालेंकाने ७-६ असा खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये गॉफने शानदार पुनरागमन केले. तिने या सेटमध्ये २-० ने आघाडी घेतली. त्यानंतर सबालेंकाने बॅकहँडचा शानदार वापर करत पिछाडी कमी केली. गॉफने मात्र आक्रमक खेळ सुरूच ठेवला. अखेर हा सेट तिने ६-२ असा सहज खिशात घातला. सामना १-१ अशा बरोबरीत सुटल्यानंतर तिसऱ्या सेटने उत्सुकता वाढवली.

तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जीवतोड खेळ केला. गॉफने ३-१ ने आघाडी घेतली असली तरी ती फार काळ टिकली नाही. सबालेंकाने लागोपाठ दोन पाँईंट मिळवत हा सेट ३-३ असा बरोबरीत आणला.

त्यानंतर कोको गॉफने सामन्यावरची पकड मजबूत केली. तिने ६-४ ने हा सेट खिशात घालत सामना आपल्या बाजूने वळवला. या सामन्यातील विजयामुळे गॉफने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video