क्रीडा

राजधानी कोलंबोमध्ये पेट्रोल भरण्यासाठी क्रिकेटपटू चक्क दोन दिवस रांगेत

एका वृत्तसंस्थेला चमिकाने सांगितले की, दोन दिवस लांब रांगेत उभे राहिल्यानंतर मला पेट्रोल मिळाले.

वृत्तसंस्था

श्रीलंकेला आर्थिक आणि राजकीय संकट भेडसावत असतानाच प्रचंड इंधनटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी दोन दिवस रांगा लावाव्या लागत आहेत. श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेला पेट्रोल भरण्यासाठी चक्क दोन दिवस रांगेत उभे राहावे लागले. राजधानी कोलंबोमध्ये दोन दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर त्याने गाडीत पेट्रोल भरले.

एका वृत्तसंस्थेला चमिकाने सांगितले की, दोन दिवस लांब रांगेत उभे राहिल्यानंतर मला पेट्रोल मिळाले. क्लब क्रिकेटचा हंगाम सुरू असल्याने मला सरावासाठी कोलंबो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून मी इंधनासाठी रांगेत उभा होतो. मलाही इंधन भरण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मिळालेले हे दहा हजार रुपयांचे पेट्रोल जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस चालेल.

श्रीलंकेत आणीबाणीच्या काळात आता राजकीय संकटही निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक २०२२च्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे; मात्र चमिकाने स्वतःबद्दल आणि श्रीलंकेच्या संघाच्या तयारीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

तो म्हणाला की, आशिया चषक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत आणि मोठ्या स्पर्धेसाठी सरकार पुरेसे इंधन उपलब्ध करेल, याची मला खात्री आहे. आशिया चषक स्पर्धेची तयारीही जोरात सुरू आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी