क्रीडा

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा; भारताची पाकिस्तानविरुद्ध २-०ने आघाडी, रामकुमार, बालाजी यांचे विजय

रामकुमार रामनाथन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी दमदार कामगिरी केल्यामुळे भारताला पाकिस्तानच्या आव्हानाला दमदार प्रत्युत्तर देता आले.

Swapnil S

इस्लामाबाद : रामकुमार रामनाथन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी दमदार कामगिरी केल्यामुळे भारताला पाकिस्तानच्या आव्हानाला दमदार प्रत्युत्तर देता आले. या दोघांच्या विजयामुळे भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक आय गटाच्या प्ले-ऑफ फेरीत पाकिस्तानविरुद्ध

२-० अशी आघाडी घेतली आहे.

अतिशय तणावपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या गटातील सामन्यात पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशी याने रामकुमारसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र तिसऱ्या सेटमध्ये उद्भवलेल्या मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे कुरेशीचा रामकुमारविरुद्ध निभाव लागला नाही. रामकुमारने दमदार सर्व्हिस करत या सामन्यात ६-७ (३), ७-६ (४), ६-० अशी बाजी मारली. रामकुमारची वेगवान सर्व्हिस या सामन्यात महत्त्वाची ठरली. एका सेटने पिछाडी तसेच दुसऱ्या सेटमध्ये ३-४ अशा पिछाडीवर पडल्यानंतर रामकुमारने रामकुमारने २० बिनतोड सर्व्हिस टाकल्या आणि विजय संपादन केला.

दुहेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या एन. श्रीराम बालाजी याने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा वरिष्ठ टेनिसपटू अकील खान याला ७-५, ६-३ असे दोन सेटमध्ये पराभूत केले. आता जागतिक गटात मजल मारण्यासाठी भारताला एका विजयाची आवश्यकता आहे. बालाजीने सुरुवातीपासूनच या सामन्यावर पकड मिळवली होती, त्यानंतर दोन्ही सेटमध्ये प्रत्येकी एकदा अकील खानची सर्व्हिस भेदत बालाजीने या सामन्यात सरशी साधली. आता रविवारी होणाऱ्या दुहेरीच्या सामन्यात युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांची लढत मुझम्मिल मुर्तझा आणि बरकत उल्ला यांच्याशी होईल. हा सामना भारताने जिंकल्यास, ही लढत भारताच्या नावावर होईल.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक