X (IPL)
क्रीडा

DC vs RCB, IPL 2025 : दिल्लीची आज बंगळुरूशी गाठ; कोहली-राहुलच्या खेळीवर नजरा

हंगामात चांगलेच फॉर्मात असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे फलंदाज या लढतीचे मुख्य आकर्षण ठरतील, तर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड हे दिग्गज गोलंदाज सामन्याची रंगत वाढवतील.

Swapnil S

नवी दिल्ली : हंगामात चांगलेच फॉर्मात असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे फलंदाज या लढतीचे मुख्य आकर्षण ठरतील, तर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड हे दिग्गज गोलंदाज सामन्याची रंगत वाढवतील.

आयपीएलमध्ये काही गोष्टी चटकन बदलतात. परंतु दिल्ली आणि बंगळुरू यांचा सध्याचा फॉर्म पाहता ते ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे. फिरोझशहा कोटला मैदानावर होणारी ही लढत जिंकणाऱ्या संघाला हे २ गुण आगेकूच करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

गेल्या ९ सामन्यांत ५ अर्धशतके झळकावणाऱ्या विराट कोहलीसाठी घरचे मैदान फायदेशीर ठरू शकते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू असूनही कोहलीकडून धावांची बरसात व्हावी, अशी अपेक्षा दिल्लीकर चाहत्यांना असेल.

स्टार्क विरुद्ध हेझलवुड

स्टार्क आणि हेझलवुड हे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करत आहेत. हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत हेझलवुडने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत, तर स्टार्क देखील प्रभागी गोलंदाजी करत आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीत त्याने ब्लॉक होलवर गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत