PM
क्रीडा

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा :सरस्वती स्पोर्टस क्लब विजयी

सरस्वती स्पोर्ट्स क्लबने सामन्याच्या पूर्वार्धात ८-७ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांना विजेतेपदाकडे घेऊन गेली.

Swapnil S

ठाणे : मुंबई शहराच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबने नवी मुंबईच्या ग्रीफिन जिमखान्याचा अवघ्या एका गुणाने पराभव करत श्री आनंद भारती समाजाने चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या त्रिजिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हा सामना सरस्वती स्पोर्ट्स क्लबने १३-१२ असा जिंकला.

सरस्वती स्पोर्ट्स क्लबने सामन्याच्या पूर्वार्धात ८-७ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांना विजेतेपदाकडे घेऊन गेली. आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देताना रोहन टेमकरने २ मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात २ गडी बाद केले. त्याला प्रसाद पठाडे (२.२० मि.) व चैतन्य धुळूप (३ गडी) यांनी सुरेख साथ दिली. पराभूत संघाकडून सुफियान शेखने (१.२० मि.,  ३ गडी) दमदार खेळ केला. सुफियान शेख स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक, तर प्रसाद पहाडे सर्वोत्तम संरक्षक ठरला. राहुल जावळेला स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी