संग्रहित छायाचित्र पीटीआय
क्रीडा

Duleep Trophy 2025: जुरेलकडे मध्य विभागाचे नेतृत्व; पाटीदार, कुलदीपलाही संधी

चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांचा आगामी दुलीप ट्रॉफीसाठी मध्य विभागाच्या संघात (सेंट्रल झोन) समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

इंदूर : चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांचा आगामी दुलीप ट्रॉफीसाठी मध्य विभागाच्या संघात (सेंट्रल झोन) समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुरेलकडेच या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

विदर्भाचा फिरकीपटू हर्ष दुबे व राजस्थानचा मानव सुतार यांचादेखील मध्य विभागात समावेश आहे. हर्षने यंदा रणजी हंगामात सर्वाधिक ६९ बळी मिळवून विदर्भाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आयपीएलच्या १८व्या हंगामाचे जेतेपद मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करेल.

मध्य विभाग संघ

ध्रुव जुरेल (कर्णधार), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, आयुष पांडे, दानिष मलेवार, शुभम शर्मा, संचित देसाई, यश राठोड, कुलदीप यादव, हर्ष दुबे, आदित्य ठाकरे, मानव सुतार, दीपक चहर, खलिल अहमद, सारांश जैन. राखीव : यश ठाकूर, महिपाल लोमरोर, कुलदीप सेन.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास