क्रीडा

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर मात

इंग्लंडने दिलेल्या २३५ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १९३ धावांपर्यंतच मजल मारता आली

वृत्तसंस्था

जॉनी बेअरस्टो (५३ चेंडूंत ९० धावा) आणि मोईन अली (१८ चेंडूंत ५२) या जोडीने अवघ्या ३५ चेंडूंत रचलेल्या १०६ धावांच्या धडाकेबाज भागीदारीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४१ धावांनी सहज मात केली.

या विजयासह इंग्लंडने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने दिलेल्या २३५ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १९३ धावांपर्यंतच मजल मारता आली. ट्रिस्टियन स्ट्रब्स (२८ चेंडूंत ७२) आणि रीझा हेंड्रीक्स (३३ चेंडूंत ५७) यांनी आफ्रिकेकडून दमदार फलंदाजी केली. परंतु त्यांना अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही.

तत्पूर्वी, बेअरस्टोने आठ षटकार आणि तीन चौकार लगावले. तर अलीने सहा षटकार आणि दोन चौकारांची आतषबाजी केली. डेव्हिड मलान (२३ चेंडूंत ४३) आणि जोस बटलर (७ चेंडूंत २२) यांनीही उपयुक्त योगदान दिल्यामुळे इंग्लंडने २० षटकांत ६ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली