क्रीडा

सोफी एक्लस्टनचे पुनरागमन; भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा महिला संघ जाहीर

भारतीय महिला संघाविरुद्ध २८ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा १४ सदस्यीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लस्टनचे या संघात पुनरागमन झाले आहे.

Swapnil S

लंडन : भारतीय महिला संघाविरुद्ध २८ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा १४ सदस्यीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लस्टनचे या संघात पुनरागमन झाले आहे.

नॅट स्किव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अर्लॉट, टॅमी ब्यूमाँट (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, ॲलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी एक्लस्टन, लॉरेन फिलर, एमी जोन्स (यष्टीरक्षक), पेज शोलफिल्ड, लिंसी स्मिथ, डॅनी वायट-हॉज, इसी वॉन्ग असा इंग्लंडचा १४ सदस्यीय संघ आहे.

भारत व इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २८ जून रोजी ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाईल. दुसरा सामना १ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये, तिसरा ४ जुलै रोजी द ओव्हलवर होईल. चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे ९ व १२ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड आणि एडग्बॅस्टन येथे होणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा