क्रीडा

संघात निवड होऊनही राहुलला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट

वृत्तसंस्था

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद हे लोकेश राहुलकडे देण्यात आलेले असले, तरी राहुल हा या स्पर्धेसाठी संघाबाहेर होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. राहुल हा दुखापतीमधून बरा झाल्यानंतर त्याची संघात निवड झाली असली, तरी त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या फिटनेस चाचणीत जर तो अपयशी ठरला तर त्या आशिया स्पर्धेत खेळता येणार नाही. राहुलच्या फिटनेस टेस्टचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुलला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीचे उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला होता. राहुल जर्मनीहून आल्यानंतर इंग्लंड दौऱ्यात खेळणार असतानाच त्याला कोरोना झाला. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले.

कोरोनामधून बरा झाल्यावर राहुल आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला संघाचे कर्णधारपदही मिळण्याची शक्यता होती; पण पुन्हा एकदा राहुलला दुखापत झाली. त्यामुळे राहुलला पुन्हा एकदा भारताच्या संघात स्थान मिळवता आले नाही; पण त्यानंतर आता त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. राहुलला फक्त संघात स्थान मिळाले नाही तर त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे; पण तरीही तो या मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत संदिग्धता आहे.

मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दहशतवादी हल्ले; भाजप कार्यकर्त्याची हत्या

तेव्हा कुणालाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते; ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

मतदान टक्केवारी जबाबदारी केवळ मतदारांची नाही!

विभव कुमार यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी