क्रीडा

GT vs RR : स्पर्धेवरील पकड टिकवून ठेवण्याचा गुजरातचा प्रयत्न; राजस्थानविरुद्ध आज लढत

अफलातून फॉर्मात असलेला गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील आपली मजबूत पकट टिकवून ठेवण्यासह ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Swapnil S

जयपूर : अफलातून फॉर्मात असलेला गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील आपली मजबूत पकट टिकवून ठेवण्यासह ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोमवारी हा संघ तळात घुटमळत असलेल्या राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरातचा संघ चांगलाच लयीत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांत बाजी मारत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला ‘प्ले ऑफ’चे तिकीट निश्चित करण्यासाठी केवळ २ विजयांची आवश्यकता आहे. हंगामात टायटन्सच्या संघाने केवळ दोन सामने गमावले आहेत.

साई सुदर्शन आणि प्रसिध कृष्णा हे खेळाडू अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या स्पर्धेत आहेत.

गिल, सुदर्शन आणि जोस बटलर ही तिकडी गुजरातच्या फलंदाजीची ताकद आहे. या तिघांनी प्रत्येकी ३०० पेक्षा अधिक धावा केल्या असून त्यांच्या खेळीत सातत्य आहे.

खासगी कारणास्तव हंगामाच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा मायदेशी परतला आहे. मात्र तरीही अन्य गोलंदाजांनी त्याची उणीव भासू दिली नाही.

दुखापतीतून परतल्यानंतर प्रसिधने शानदार पुनरागमन केले आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये १६ विकेट मिळवल्या आहेत. मोहम्मद सिराजही गोलंदाजीत प्रभावी ठरला आहे. त्याने आतापर्यंत १२ फलंदाजांना माघारी धाडले आहे.

दरम्यान या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ११ धावांनी पराभूत झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. हंगामातील हा त्यांचा सलग पाचवा आणि नऊ सामन्यांतील सातवा पराभव होता.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास