क्रीडा

एच. एस.प्रणॉयचा विजयी धडाका कायम;उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

वृत्तसंस्था

भारताचा तारांकित बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने चमकदार कामगिरीत सातत्य राखले आहे. प्रणॉयने गुरुवारी माजी जागतिक विजेत्याला धूळ चारून जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अनुभवी किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र प्री-क्वार्टरफायनलमध्ये संपुष्टात आले.

दिल्लीच्या ३० वर्षीय प्रणॉयने सिंगापूरच्या लोह कीन यू याला ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २२-२०, २१-१९ असे पराभूत केले. शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत प्रणॉयसमोर चायनीज तैपईच्या चोऊ टिन चेनचे कडवे आव्हान असेल. प्रणॉयने गेल्या आठवड्यात जागतिक स्पर्धेतसुद्धा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यावेळी तो हा अडथळा ओलांडून उपांत्य फेरी गाठणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अन्य लढतीत जपानच्या कांता त्सुनेयामाने भारताच्या श्रीकांतवर २१-१०, २१-१६ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. त्यामुळे आता फक्त प्रणॉयवरच भारताच्या आशा टिकून आहेत.

पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत महिला एकेरीत सायना नेहवालवर भारताची भिस्त होती. परंतु तिला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याशिवाय लक्ष्य सेनही सलामीलाच गारद झाला. गायत्री गोपिचंद आणि ट्रीसा जॉली तसेच चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी या जोड्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रकुलमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी बजावली होती.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा