एक्स - (@mufaddal_vohra)
क्रीडा

IND vs NZ : तिसऱ्या कसोटीसाठी हर्षित राणा भारतीय संघात; बुमराहला विश्रांती देणार?

दिल्लीचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : दिल्लीचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता हर्षितला पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरले.

तिसऱ्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळताना यंदा हर्षितने छाप पाडली. त्याला बांगलादेश संघाविरुद्धच्या मालिकेसाठीही राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले होते. हर्षितला रणजी स्पर्धेतील आसामविरुद्धच्या लढतीसाठी दिल्ली संघातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तो बुधवारपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते.

हर्षितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर- गावस्कर कसोटी मालिकेसाठीही भारताच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्यासाठीही ड्रेसिंग रूम वातावरणाची सवय व्हावी, म्हणून त्याला संधी दिली असावी, अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगत आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराहला विश्रांती देत हर्षित व आकाश दीप वेगवान माऱ्याची धुरा वाहू शकतात.

दरम्यान, भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी शुक्रवार, १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. २२ नोव्हेंबरपासून भारत- ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

विल्यम्सनची माघार

न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सन स्नायूंच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे. आता तो इंग्लंडविरुद्ध २८ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या कसोटी मालिकेतच खेळताना दिसू शकेल.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद; अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक! शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा