Twitter
क्रीडा

लक्ष्यची ऐतिहासिक कामगिरी! प्रथमच भारताच्या एखाद्या खेळाडूची उपांत्य फेरीत धडक

भारताच्या २२ वर्षीय लक्ष्य सेनने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिकच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान लक्ष्यने मिळवला.

Swapnil S

पॅरिस : भारताच्या २२ वर्षीय लक्ष्य सेनने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिकच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान लक्ष्यने मिळवला. आता रविवारी लक्ष्यसमोर व्हिक्टर अल्केलसन किंवा लोह किन यू यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल.

अल्मोरा येथील २२ वर्षीय लक्ष्य जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी आहे. मात्र त्याने या स्पर्धेत एखाद्या अग्रमानांकित खेळाडूसारखा खेळ केला आहे. लक्ष्यने गटसाखळीत जोनाथन ख्रिस्तिसारख्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूला नमवले. मग उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयचा त्याने धुव्वा उडवला. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर चायनीज तैपईच्या चोऊ टिन चेनचे आव्हान होते. टिन क्रमवारीत १२व्या स्थानी आहे.

मात्र लक्ष्यने ३४ वर्षीय टिनवर १९-२१, २१-१५, २१-१२ अशी पिछाडीवरून तीन गेममध्ये सरशी साधून इतिहास रचला. पहिल्या गेममध्येही लक्ष्यने त्याला कडवी झुंज दिली. मग दुसऱ्या गेमपासून लक्ष्यने आक्रमणावर भर देत टिनला निष्प्रभ केले. आता फक्त लक्ष्यवरच बॅडमिंटनमधील पदकाच्या आशा टिकून आहेत.

> लक्ष्य हा भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष ठरला. यापूर्वी २०१२मध्ये पारुपल्ली कश्यप, तर २०१६मध्ये किदाम्बी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र लक्ष्यने त्यांच्यापुढे एक पाऊल टाकले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास