क्रीडा

इयान चॅपेल यांचा ४५ वर्षांपासूनच्या समालोचनाला अलविदा

७८ वर्षीय चॅपेल हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी गेल्या ४५ वर्षांपासूनच्या समालोचनाच्या कारकीर्दीला अलविदा केले. त्यांनी आपल्या सुमारे साडेचार दशकांच्या कारकीर्दीचा समारोप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी समालोचनामधून निवृत्ती घेतली.

७८ वर्षीय चॅपेल हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, “मला आजही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा दिवस आठवतो. खेळ आता पुरे झाला, अशी जाणीव तेव्हा मला झाली होती. समालोचन सोडण्याचा निर्णय घेताना मला खूप विचार करावा लागला. काही वर्षांपूर्वी किरकोळ झटका (स्ट्रोक) आला होता. तेव्हा मी नशीबवान ठरलो. आरोग्याच्या समस्यांमुळे आता सर्वकाही कठीण होत आहे.” चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी ७५ कसोटी सामने खेळले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी समालोचन सुरू केले. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट वाहिनी, ‘चॅनल नाईन’साठी रिची बेनॉड, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासमवेत चॅपेल यांनी समालोचनाचे काम केले. ‘कसा समालोचक म्हणून लोकांनी तुम्हाला आठवणीत ठेवावे?” असा प्रश्न विचारला असता, गमतीदार उत्तर देत चॅपेल म्हणाले, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. काहींना वाटेल की, मी चांगले काम केले. काहींना वाटेल की, अतिशय वाईट होतो. याचा मला थोडाही फरक पडत नाही.” चॅपेल यांना त्वचेच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. याशिवाय, त्यांना आरोग्याच्या इतर समस्याही आहेत.

क्रिकेट खेळामध्ये दोन्ही संघ, पंच आणि मैदानाबरोबर चांगल्या समालोचकालादेखील तितकेच महत्त्व आहे. काही प्रसिद्ध क्रिकेट समालोचकांनी आपल्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात कायमची जागा मिळवलेली आहे. अशाच समालोचकांमध्ये इयान चॅपेल यांचा उल्लेख होतो.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत