क्रीडा

भारतीय महिलांची विजयी आघाडी!

Swapnil S

सिल्हेट : डावखुरी फिरकीपटू राधा यादवने (२२ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला शफाली वर्माच्याच्या (३८ चेंडूंत ५१ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ७ गडी आणि ९ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून उभय संघांतील चौथा सामना सोमवारी खेळवण्यात येईल.

सिल्हेट येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत जेमतेम ८ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारली. दिलाला अख्तर (३९) व कर्णधार निगर सुल्ताना (२८) यांनी चांगली सुरुवात केल्यानंतरही बांगलादेशचा डाव १ बाद ४६वरून ६ बाद १०८ असा गडगडला. श्रेयांका पाटील, पूजा वस्त्रकार व रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेत राधाला उत्तम साथ दिली.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १८.३ षटकांतच विजय मिळवला. शफाली व महाराष्ट्राची स्मृती मानधना (४७) यांनी ७३ चेंडूंत ९१ धावांची सलामी नोंदवली. शफालीने ८ चौकार लगावून कारकीर्दीतील नववे अर्धशतक साकारले. तर स्मृतीने ५ चौकार व १ षटकार लगावला. या दोघी बाद झाल्यावर दयालन हेमलता (९) लवकर माघारी परतली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ६) व रिचा घोष (नाबाद ८) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शफाली सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस