क्रीडा

वेस्ट इंडिजविरुध्दच्या टी-२० सामन्याच्या मालिकेवर भारताचा कब्जा; रोहित शर्माने रचला मोठा विक्रम

वृत्तसंस्था

भारताने वेस्ट इंडिजविरुध्दच्या चौथ्या टी-२० सामन्यात ५९ धावांनी पराभव करीत पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेवर ३-१ ने कब्जा केला. या मालिका विजयासह भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम रचला आहे. भारताचा हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आठवा विजय ठरला.

चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारताने प्रथम फलंदाजी करत १९१ धावांचा डोंगर रचला. विजयासाठी १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली.

भारताच्या अर्शदीप सिंग, आवेश खान आणि अक्षर पटेल या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. वेस्ट इंडिजचा डाव १३२ धावांत संपुष्टात आला आणि भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला.

रोहितने कर्णधारपद स्वीकारल्यावर संघाला एकामागून एक विजय मिळत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्येही मालिका जिंकली होती. आता वेस्ट इंडजवरही भारताने मालिका विजय साकारला.

पाचव्या सामन्यासाठी

हार्दिक पंड्या कर्णधार

अंतिम पाचव्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने त्याच्या जागी हार्दिक पंड्याने नेतृत्व केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित व्यतिरिक्त भारतीय संघाने या सामन्यासाठी ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती दिली. इशान किशन, कुलदीप यादव, पंड्या आणि श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले.

वेस्ट इंडिजने चार बदल करताना शामराह ब्रूक्स, हेडन वॉल्श, ओडिन स्मिथ आणि कीमो पॉल यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?