Twitter
क्रीडा

India at Olympics, Day 9 Full Schedule: लक्ष्य सेनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा, बघा भारताचे ४ ऑगस्टचे वेळापत्रक

Swapnil S

Paris 2024 Olympics Day 9: ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’ ठेवत त्यादृष्टीने आगेकूच केली आहे. आता रविवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याच्यासमोर विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता विक्टर ॲॅक्सेलसेन याचे आव्हान असणार आहे. रविवारी बॅडमिंटन आणि हॉकीसह सेलिंग, बॉक्सिंग,नेमबाजी, ॲथलेटिक्समध्ये भारताला चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

> नेमबाजी

२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल पुरुष

विजयवीर सिधू, अनिश भानवाला

(दुपारी १२.३० वा.)

स्कीट (महिला पात्रता फेरी)

राइझा विल्सन, महेश्वरी चौहान

(दुपारी १.०० वा.)

> हॉकी

पुरुष उपांत्यपूर्व फेरी

भारत वि. ग्रेट ब्रिटन

(दुपारी १.३० वा.)

> ॲथलेटिक्स

महिला ३ हजार मीटर स्टिपलचेस पहिली फेरी

पारूल चौधरी

(दुपारी १.३५ वा.)

पुरुष उंच उडी पात्रता फेरी

जेस्विन अल्ड्रिन

(दुपारी २.३० वा.)

> बॉक्सिंग

महिला उपांत्यपूर्व फेरी (७५ किलो)

लव्हलिना बोर्गोहेन वि. ली कियान

(दुपारी ३.०२ वा.)

> बॅडमिंटन

पुरुष एकेरी उपांत्य फेरी

लक्ष्य सेन वि. विक्टर ॲॅक्सेलसेन

(दुपारी ३.३० नंतरच)

> सेलिंग

पुरुषांची सातवी, आठवी शर्यत

विष्णू सर्वानन

(दुपारी ३.३५ वा.)

महिलांची सातवी, आठवी शर्यत

नेत्रा कुमानन

(सायंकाळी ६.०५ वा.)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला