भारतीय पुरुषांचा पुन्हा पराभव X
क्रीडा

भारतीय पुरुषांचा पुन्हा पराभव

भारतीय संघ इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला असून इंग्लंड आणि आयर्लंडने सर्वच विभागांत भारतावर मात केली, अशी प्रांजळ कबुली भारताचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याने दिली. या पराभवाच्या अनुभवातून आपल्याला भविष्यात एक चांगला कर्णधार बनण्यास मदत होईल, असेही त्याने नमूद केले.

Swapnil S

लंडन : भारतीय संघ इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला असून इंग्लंड आणि आयर्लंडने सर्वच विभागांत भारतावर मात केली, अशी प्रांजळ कबुली भारताचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याने दिली. या पराभवाच्या अनुभवातून आपल्याला भविष्यात एक चांगला कर्णधार बनण्यास मदत होईल, असेही त्याने नमूद केले.

टी-२० विश्वचषक विजयानंतर सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अय्यरसाठी या पदाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ०-४ अशा फरकाने गमवावी लागली. या मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वाढत्या अपेक्षांच्या दडपणाबाबत विचारले असता अय्यर म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर हे अजिबात कठीण नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे हा मी माझा बहुमान समजतो. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे आणि यशाची शिखरे गाठण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मला दडपणाखाली खेळायला नक्कीच आवडते. अशा कठीण प्रसंगांमधून शिकल्यामुळे मला भविष्यात मदत होईल.”

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

Mumbai : सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करा! ­समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Mumbai : विसर्जन सुरक्षित पार पडण्यासाठी दक्षता घ्या! अतिरिक्त आयुक्त डॉ. ढाकणे यांचे निर्देश