क्रीडा

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ; शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार

पाच दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारली

वृत्तसंस्था

एकामागून एक आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमुळे काही वरिष्ठ आजी-माजी खेळाडू वैतागले आहेत. यादरम्यानच शुक्रवारपासून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करणार आहे. उभय संघांतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून या मालिकेत प्रामुख्याने नव्या तसेच अननुभवी खेळाडूंना संधी देण्याचे भारताचे उद्दीष्ट असेल

पाच दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारली. आता विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंना निवड समितीने विश्रांती देण्याचे ठरवले. त्यामुळे आता पर्यायी खेळाडू या संधीचा कशाप्रकारे लाभ उचलतात, हे पाहणे रंजक ठरेल.

धवनच्या साथीने सलामीसाठी डावखुऱ्या इशान किशनला प्राधान्य मिळण्याची शक्यता असून तिसऱ्या क्रमांकावर दीपक हूडाला संधी मिळू शकते. त्यानंतर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा असा भारताचा फलंदाजी क्रम असेल. गोलंदाजीत मोहम्मद सिराज भारताच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. यजुवेंद्र चहल फिरकीची धुरा वाहील. प्रसिध कृष्णा आणि आवेश खान यांच्यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार