@BCCI
क्रीडा

Ind vs Aus ODI : राहुल-जडेजाच्या खेळीमुळे भारतीय संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Ind vs Aus ODI) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने केली ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात

प्रतिनिधी

भारत आणि आस्ट्रेलियामध्ये (Ind vs Aus ODI) सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय प्राप्त केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. १८९ असे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवल्यानंतर भारताचे पहिले ४ फलंदाज स्वस्तात परतले. त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीमुळे भारताला विजयला गवसणी घातली.

१८९चे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने दिल्यानंतर भारताचे पहिले ३ फलंदाज हे स्वस्तात बाद झाले. ३९ वर ४ बाद अशी स्थिती असताना केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने छोटी पण महत्त्वाची भागीदारी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांड्या २५ धावांवर बाद झाला आणि भारतीय संघ ८३वर ५ बाद अशी झाली. यावेळी राहुल आणि रवींद्र जडेजाने सयंमी खेळी करत ६व्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. यावेळी राहुलने ७५ धावांची नाबाद खेळी करत १३वे अर्धशतक साजरे केले. तसेच, जडेजानेही ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ३५.४ षटकांमध्ये १८८ धावा केल्या. यावेळी मिशेल मार्श याने ८१ धावांची खेळी केली. मात्र, एकही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही. तसेच, यावेळी शमी आणि सिराजच्या प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर, जडेजाने २ आणि हार्दिक पांड्या, कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

सात धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा; पण राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार, राज्य सरकारची मंजुरी

Mumbai : कसारा लोकल गेली मेल गाडीच्या फलाटावर; मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, तांत्रिक चुकीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

Nashik : ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामाला मंजुरी; नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांकडून हिरवा कंदील

पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवू नका! अमेरिकेच्या पुढाकाराने इराणवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा

आईच्या संघर्षाला यशाचे पंख! उल्हासनगरच्या विशुध्दी-सम्यकची आकाशभरारी; विमानशास्त्रात घडवली नवी ओळख