क्रीडा

भारतीय खेळाडूंनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट; भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांची भेट घेतली. ३० नोव्हेंबरपासून कॅनबरा येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एकादश संघाविरुद्ध २ दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पार्लामेंट हाऊस, कॅनबरा येथे भारतीय संघाना अल्बानिज यांची भेट घेण्यासाठी आमंत्रित केले होते.

Swapnil S

कॅनबरा : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांची भेट घेतली. ३० नोव्हेंबरपासून कॅनबरा येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एकादश संघाविरुद्ध २ दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पार्लामेंट हाऊस, कॅनबरा येथे भारतीय संघाना अल्बानिज यांची भेट घेण्यासाठी आमंत्रित केले होते.

यावेळी अल्बानिज यांना रोहितने सर्व खेळाडूंची ओळख करून दिली. तसेच त्यांनी भारतीय खेळाडूंशी निवांत संवादही साधला. याव्यतिरिक्त, ट्विटरवर भारतीय संघाविरुद्ध सराव सामना खेळताना पंतप्रधान एकादश संघाला फार मजा येईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका यापुढेही रंगतदार होईल, असेही म्हटले.

वेबस्टर ऑस्ट्रेलिया संघात : ३० वर्षीय अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मिचेल मार्शच्या पायाला सूज आल्याने तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे वेबस्टरला पदार्पणाची संधी मिळू शकते. ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात (डे-नाईट) दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. पाच लढतींच्या मालिकेत भारतीय संघ १-० असा आघाडीवर आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस